Monday, November 8, 2010

"मन वेडे "

जे योजिले ते न घड़े ...
जे ना योजिले तेच सदा घड़े...
का बरे नियति असा खेल मांडे ??
काय घालू देवाला मी साकडे ???
वेड्या मनाला रोज़ नवे स्वप्न पड़े ..
चंचल ही कसली नवी सवय जड़े ...

समजू पाही काहीतरी शबदांच्या पलिकडे ..
सतत भिरभिरत राही इकडे तिकडे ..
नाही कले त्याला मन हे वेडे ...
ते तर आहे आभासी चान्दन्यांचे सड़े !!!

कधी वाटे बंद झाली सारी कवाडे ...
कसली ही दुनियादारी माणसाला नडे ...
सगलीकडे नुसते स्तब्ध कठडे ...
कसे कोणी जाई भिंती पलिकडे....

आशा अकांशाना पडले तडे ..
जिद्द्द मनाची थोड़ी थोड़ी झडे ...
कुठेच काही मार्ग नाही सापडे ...
पाऊल ही पडायला लागले आहे वाकडे !!!!

अरुनोदयाचा प्रकाश पसरे चोहिकडे ...
काय करू शकणार आहेत हे दिन्दम्ड़े ???
उरी तेजोमय तेज दडे ....
शिकवू स्वार्थी जगाला धड़े !!!!

पिवाले कोवले उन् हे सांडे ..
राहिले नाही काहीच निसरदे ..
वेडे मन आता पुन्हा धड्पड़े ..
झेप घेण्यास आकाशकडे !!!!

ते सर्वा होते शन्भंगुर कीड़े ,,,
दूर नजर आहे आता वाटेकडे ...
आता पहायचे नाही शनिक आकडे ...
साथ मिलुनी वाजवू यशाचे चौघडे !!!!!!!!
 
 
 
                                            by VASUDHA!!!!