मी आज त्याला अनुभवला.....
मी आज सूर्य अनुभवला
त्याच्या कर्तुत्वात, संघर्षात, यशात
कमालीची तप्त आग होती त्यात
आणि मी सुद्धा उजळून गेले त्यात
कळत नकळतच....
मी आज चंद्र अनुभवला
त्याच्या वागण्यात, बोलण्यात, स्वभावात
कमालीची शीतलता होती त्यात
आणि मी सुद्धा शांत झाले त्यात
कळत नकळतच....
मी आज अवखळ बेधुंद वारा अनुभवला
त्याच्या खळीमधल्या गोड हास्यात
कमालीचा गोडवा होता त्यात
आणि मी सुद्धा मधुर झाले त्यात
कळत नकळतच....
मी आज निरभ्र, स्वछ आभाळ अनुभवल
त्याच्या मोठ्या मनात
कमालीची विशालता होती त्यात
आणि मी सुद्धा सामावून गेले त्यात
कळत नकळतच....
मी आज कोसळणारा पाउस अनुभवला
त्याच्या आर्त डोळ्यांत
कमालीचा विरह होता त्यात
आणि मी सुद्धा ओलेचिम्ब झाली त्यात
कळत नकळतच....
मी आज सुंदर मनमोहक वसंत अनुभवला
त्याच्या स्पर्शात
त्याच्या श्वासात
त्याच्या देहात
कमालीच सौंदर्य होत त्यात
आणि मी सुद्धा कणनकण बहरून गेले त्यात
कळत नकळतच....
मी आज त्याला अनुभवला
अगदी जवळून
मनाने, देहाने, आत्म्याने
परिस होत त्यात
आणि माझ कळत नकळतच.... सोन झाल त्यात
वसुधा
No comments:
Post a Comment